आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी सावंत यांनी बीसीसीआयच्या कोषाध्यक्षाची सूत्रे स्वीकारली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अजय शिर्के यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाची सूत्रे रवी सावंत यांनी बुधवारी स्वीकारली.शिर्के यांनी राजीनामा दिल्यामुळे बीसीसीआयच्या कोशागाराचा कारभार बंद पडला होता.

बीसीसीआयच्या पेन्शन योजनेचा लाभ घेणा-या क्रिकेटपटू व त्यांच्या विधवांना मोठा फटका बसला. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना निवृत्तिवेतन मिळाले नाही. त्याचप्रमाणे बीसीसीआयच्या अन्य बाबींचादेखील कोशाध्यक्ष नसल्यामुळे खोळंबा झाला आहे. अनेक अर्थविषयक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याशिवाय ‘ऑडिट’ तोंडावर आल्यामुळे नव्या कोशाध्यक्षांना झपाट्याने कामे करावी लागणार आहेत.


दरम्यान, रवी सावंत यांनी धोनी व रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट यांच्यातील संबंधांवर केलेले भाष्य हे त्यांचे वैयक्तिक मत होते, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी स्पष्ट केले आहे.