आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ravi Shastri Call Players For Practice, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय खेळाडूंचे तातडीचे सराव शिबिर; रवी शास्त्री कार्यरत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे डायरेक्टर म्हणून होकार दिल्यानंतर रवी शास्त्रीने भारतीय क्रिकेट संघाला आकार देण्याच्या कामासाठी मुहूर्तही न पाहता तत्काळ बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत सरावासाठी भारतीय खेळाडूंना पाचारण केले आहे.चॅम्पियन्स लीगमध्ये खेळत असलेले खेळाडू वगळता अन्य सर्व क्रिकेटपटू या आठवडाभराच्या सराव शिबिरासाठी निमंत्रित आहेत.
विराट कोहली, शिखर धवन, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी यांनी आज सकाळी दोन-दोन तासांचा कसून सराव केला. शास्त्रीच्या देखरेखीखाली साहायक प्रशिक्षक संजय बांगर, बी. अरुण, आर. श्रीधर यांनी खेळाडूंचा सराव करून घेतला. कोहली, धवन, रायडू व बिन्नी हे चार खेळाडू उद्या सायंकाळी वेस्ट इंडीजविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.