आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री उत्सुक! बीसीसीआयने संधी दिल्यास शास्त्री सूत्रे घेण्यास राजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - दोन दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने अचानक घेतलेल्या निवृत्तीसह टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मायकेल हसीच्या नावाची शिफारस केल्याने नव्या चर्चेला उधाण आले. त्यामुळे सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असणाऱ्यांच्या हालचालींना वेग आला. त्यासाठी आता रवी शास्त्रींनीदेखील संकेत दिले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रस्ताव दाखल केल्यास आपणही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी नुकतीच दिली. मात्र, याबाबत अद्याप कोणताही विचार करत नाही. वर्ल्डकपनंतरच या पदावर कार्यरत होण्याचा विचार करेल, असेही ते म्हणाले. येत्या १४ फेब्रुवारीपासून वनडे वर्ल्डकपला प्रारंभ होणार आहे. तसेच तत्कालीन प्रशिक्षक फ्लेचर यांचा करारही वर्ल्डकपनंतर संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे.

गत आठवड्यापासून महेंद्रसिंग धोनी हा अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चांगलाच चर्चेत आहे. तसेच नुतन कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातील जवळीकतेमुळेच धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. मात्र, रवी शास्त्री यांनी हा आरोप फेटाळून लावला. ‘धोनीने सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊनच निवृत्तीचा निर्णय घेतला. गत वर्षभरात घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे टीम इंडियाचा दर्जा उंचावला आहे. त्यामुळे आता युवा खेळाडूकडे नेतृत्व सोपवण्याची याेग्य वेळ आली असल्याचाही त्याने विचार केला,’ अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.