आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravi Shastri News In Marathi, Divya Marathi, Indian Team

टीम इंडियाने संघर्षाची ईर्षाच दाखवली नाही : रवी शास्त्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडविरुद्धच्याकसोटी मालिकेत भारतीय संघाला अनुभवाच्या कमतरतेमुळे पराभूत व्हावे लागले. या मालिकेत भारतीय खेळाडूंमध्ये संघर्षाची ईर्षा दाखवलीच नाही, असे मत एकदविसीय संघाच्या संचालकपदी नुकतेच नियुक्त झालेले माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, खेळाडूंमध्ये असलेल्या संघर्षाच्या अभावामुळे हा पराभव झाला असून पुढील वर्षी भारतीय संघ पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर आल्यास नक्कीच चांगले प्रदर्शन करेल. भारतीय संघाने बऱ्याच कालावधीनंतर पाच सामन्यांची मालिका खेळली. ४० दविस सतत िक्रकेट खेळायची वेळ येते तेव्हा खेळाडूंची खरी परीक्षा असते. मात्र, जेव्हा संघ अनुभवहीन असेल आणिएक-दोन डावांत वाईट खेळ झाल्यास खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळतो, असेही त्यांनी म्हटले.

डंकनफ्लेचर कायम राहणार : इंग्लंडविरुद्धच्याकसोटी मालिकेत सुमार कामगिरी केल्याने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी होणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, रवी शास्त्री यांनी ती फेटाळून लावली आहे. धोनी आणडिंकन फ्लेचर यांच्यासोबत आपण दोन तासांपर्यंत चर्चा केली असून लवकरच िस्थती पूर्वपदावर येईल, असे शास्त्री यांनी म्हटले.
गावसकरांचेधोनीला समर्थन : सध्यािटकेचा धनी असलेल्या कर्णधार महेंद्रििसंग धोनीचे सुनलि गावसकरांनी समर्थन केले आहे. धोनीने कठीण काळात सामोरे येत संघाचे नेतृत्व केले आणिचांगल्या फलंदाजीचा आदर्श उभा केला. कर्णधाराला दोषी ठरवणे योग्य नव्हे, असे गावसकरांनी म्हटले आहे.