आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravi Shastri Special Interview After Dhoni Retirement

धोनी ऑस्ट्रेलियातच, पण टीमसोबत नाही -टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्र सिंह धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमागचे कारण सांगणारे टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री यांनी पहिल्यांदाच एखाद्या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. अयाज मेमन यांच्याशी शास्त्री यांनी बातचीत केली. विराटचे गुणगान करतानाच शास्त्री म्हणाले की, धोनी नेहमी त्याच्या मनात असते तेच करतो. धोनी ऑस्ट्रेलियात राहील, परंतु टीमसोबत नाही, असेही शास्त्री यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. निवृत्ती हा धोनीचा वैयक्तिक आणि धाडसी निर्णय असल्याचेही ते म्हणाले.
विराटचे वाढते प्रस्थ आणि त्याला तुमची साथ यामुळे धोनी अस्वस्थ होता अशी चर्चा आहे?
- होय, अशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. परंतु हे सगळे बकवास आहे. ड्रेसिंग रूमचे वातावरण आजदेखील चांगलेच आहे.

धोनीच्या निवृत्तीवर ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होते?
- सगळेकाही अवाक् करणारेच होते. मॅचनंतर होणार्‍या प्रेझेंटेशनपर्यंत काहीही माहिती नव्हते. निवृत्तीबाबत केवळ धोनीलाच माहिती होती.

धोनीच्या निर्णयावर भारतात मीडिया आणि त्याच्या चाहत्यांत नाराजी आहे?
- बघा, प्रत्येक खेळाडूला कधीतरी निवृत्त व्हायचेच असते. ही अत्यंत वैयक्तिक बाब असते. दुसरा त्यावर प्रश्नचिन्ह कसे काय उपस्थित करू शकतो?

पण त्याला मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळायचा नव्हता काय?
- धोनीला बहुधा स्वत:ला टीमला आपण न्याय देऊ शकत नसल्याचे वाटले असावे. परंतु यामुळे त्याचे महत्व आणखीणच वाढले आहे.

विराटचे वाढते प्रस्थ आणि त्याला तुमची साथ यामुळे धोनी अस्वस्थ होता अशी चर्चा आहे?
- होय, अशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. परंतु हा सगळा बकवास आहे. ड्रेसिंग रूमचे वातावरण आजदेखील चांगलेच आहे.

धोनी विराटमध्ये विसंवाद नव्हता का?
- माझ्यामते नाही. फक्त विराटच नाही तर संघातील प्रत्येक खेळाडू, स्पोर्ट स्टाफ प्रशासकांच्या मनातही धोनीबद्दल अतीव आदर आहे.

असे ऐकिवात आहे की, पुढच्या कसोटीत धोनी हा रिद्धिमान साहाचा स्टँडबाय राहणार आहे?
- नक्कीच. गरज भासल्यास...

तुमच्या मते धोनीत असे कोणते वैशिष्ट्य आहे, जे तो इतरांपेक्षा वेगळा असल्याचे सिद्ध करते?
- त्याने सर्वांचे इगोही जपले. सातत्यपूर्ण उत्तुंग कामगिरी केली. क्रिकेटबद्दलची बांधिलकीही जपली. मात्र, त्याच्यातील क्रिकेट संपलेले नाही. वनडे आणि टी-२० साठी धोनीमध्ये आजही बराच क्रिकेट बाकी आहे.

विराट कर्णधार बनल्यानंतर ड्रेसिंग रूमचे वातावरण बदलेल काय?
- नाही. मी माझ्या काळात अनेक कर्णधारांसोबत खेळलेलो आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. खेळाडूंना त्यांच्यानुसार खेळू देण्याची मुभा देणारे कर्णधार सर्वोत्तम असतात.

तापटपणामुळे ड्रेसिंग रूमचे वातावरण बिघडू शकते? कोहली-धवनचे उदाहरण ताजेच आहे.
- खरे तर कोहली-धवनमध्ये असे काहीही घडले नव्हते. कोहली वर्षांपासून संघात आहे. सर्वांना त्याचा स्वभाव माहीत आहे. अनेक जण तर अंडर-१९ संघाच्या वेळेपासून त्याच्यासोबत खेळत आहेत. माध्यमांत उगाच चर्चा केली जात आहे.

तुम्ही नेहमीच कोहलीच्या आक्रमकतेची स्तुती केली आहे. मात्र, जॉन्सन प्रकरणात कोहलीची भूमिका गैरवाजवी वाटत होती...
- कोहलीचे व्यक्तिमत्त्व असेच आहे. तो आक्रमक आणि सतत उत्साही असतो. तो फक्त २६ वर्षांचाच आहे, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे.

इतके काही असूनही भारतीय संघाने मालिका गमावली. वाईट वाटले नाही?
- संघ युवावस्थेत आहे. परिपक्वतेसाठी काही वेळ द्यावाच लागेल.

धोनीच्या निर्णयाशी तुम्ही असहमत आहात?
- धोनीने या एका निर्णयाने मैलांचा टप्पा पार केला आहे. त्याने १०० कसोटी आणि तशा प्रकारच्या तमाम आकडेवारीची वाट पाहिली नाही. त्याला फेअरवेलसुद्धा नको आहे. हीच त्याची क्वालिटी आहे.