आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jadeja And Suresh Raina Clash Against Each Other On Field

सामना जिंकण्‍याच्‍या टेन्‍शनमध्‍ये मैदानावरच भिडले रैना आणि जडेजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - तिरंगी मालिकेतील महत्त्वाच्‍या सामन्‍यात भारताने मोठा विजय मिळविला. परंतु, या विजयासाठी टीम इंडियाच्‍या खेळाडुंवर प्रचंड दडपण आले होते. मैदानावर झालेल्‍या एका घटनेतून हे स्‍पष्‍ट झाले. टीम इंडियाचे दोन खेळाडू मैदानावर आपसांतच भिडले. त्‍यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर कॅप्‍टन विराटने दखल देत दोघांना दूर नेले.

वेस्‍ट इंडिजमध्‍ये सुरु असलेल्‍या तिरंगी मालिकेत शुक्रवारी भारत विरुद्ध वेस्‍ट इंडिज सामना झाला. हा सामना भारताला जिंकणे आवश्‍यक होते. विराट कोहलचे दमदार शतक आणि वेगवान गोलंदाजांच्‍या दमदार कामगिरीमुळे भारताने सामना बोनस गुणासह जिंकला. परंतु, बोनस गुणासह सामना जिंकण्‍याचे दडपण भारतावर होते. ते स्‍पष्‍टपणे जाणवत होते. भारताचे दोन प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना मैदानावरच भिडले.

हा सामना भारतासाठी करा वा मरा असाच होता. बोनस गूण भारतासाठी आवश्‍यक होता. त्‍यामुळे विंडीजच्‍या फलंदाजांना लवकर बाद करणे महत्त्वाचे होते. त्‍यातच जडेजाच्‍या गोलंदाजीवर रैनाकडून एक झेल सुटला. रैनाकडून झेल सुटला आणि जडेजा चिडून त्‍याच्‍या दिशेने त्‍वेषात चालून गेला. रैनाला त्‍याने चिडून बोलायला सुरुवात केली. बाकीच्‍या खेळाडुंनी त्‍याला शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, तो ऐकायलाच तयार नव्‍हता. रैनानेही त्‍याला प्रत्‍युत्तर दिले. अखेर विराट कोहली दोघांच्‍या मध्‍ये आला आणि वाद आणखी वाढू दिला नाही.

सामना संपेपर्यंत जडेजा आणि रैनामध्‍ये खुन्‍नस कायम होती. परंतु, सामना जिंकल्‍यानतर तणाव निवळला आणि दोघेही एकत्र हास्‍यविनोद करत मैदानाबाहेर पडताना दिसले.