आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jadeja Cricketer Birthday Special Story

B\'DAY SPCL: फिरकीच्‍या जोरावर \'SIR\' बनलेल्‍या जडेजाच्‍या काही वाईट सवयी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार अष्‍टपैलू रवींद्र जडेजा आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. कदाचित इतका वाईट वाढदिवस कुठल्‍या क्रिकेटपटूचा होऊ शकत नाही. या दुनियेत आल्‍याचा आनंद तर आहे. पण त्‍याचबरोबर टीमला इतिहासातील दुस-या सर्वात मोठया पराभवाचा सामना करावा लागल्‍याचेही दु:ख आहे.

कधी सुख तर कधी दु:ख, यालाच तर आयुष्‍य म्‍हणतात. प्रत्‍येक अपयशानंतर मोठे यश नक्‍कीच मिळते. या आशेवर आपला वाढदिवस साजरा करणार आहे जडेजा. आयुष्‍यात असे चढ-उतार त्‍याने अनेकवेळा पाहिले आहेत. एकवेळ अशी होती, की त्‍याच्‍या कुटुंबियांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असत. कुटुंबियांची देखभाल करण्‍यासाठी त्‍याच्‍या वडीलांना रखवालदाराचेही काम करावे लागले. कमी वयातच त्‍याला आपल्‍या आईला गमवावे लागले. तरीसुद्धा त्‍याने आशा सोडल्‍या नाहीत. आयुष्‍यातील सर्वात मोठया पराभवानंतर (आईचा मृत्‍यू) त्‍याने स्‍वत:ला सावरले आणि आपल्‍या आईचेही स्‍वप्‍न पूर्ण केले.

एकेकाळी लुना चालवणारा जडेजा आता ऑडी कारमध्‍ये फिरतो. छोटे घर सोडून त्‍याने आपल्‍या वडील आणि बहिणींसाठी आलिशान बंगला बांधला आहे.

अशा या जिद्दी आणि धाडसी जडेजाला वाईट सवयीही आहेत. जसं की ट्विटरवर महिला चाहत्‍यांना शिवीगाळ करणे, सहकारी खेळाडूंबरोबर मैदानावरच भिडणे, इत्‍यादी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा वादग्रस्‍त स्‍टार रवींद्र जडेजाच्‍या वैयक्तिक आयुष्‍याशी निगडीत काही खास बाबी...