आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra Jadeja Found Guilty Of Level 1 Breach Of ICC Code Of Conduct, Fined 50% Of Match Fee

जडेजा अँडरसन वाद: रवींद्र जडेजावर ICCची कारवाई, मानधनात केली 50 टक्के कपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि ब्रिटीश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यात झालेल्या धक्काबुक्की तसेच शाब्दीक वादाच्या प्रकरणात आयसीसीने रवींद्र जडेजाला दोषी ठरवले आहे. आयसीसीने केवळ त्याला दोषीच ठरवले नसून मानधनामध्ये 50 टक्के कपात केली आहे. खुद्द आयसीसीनेच ही माहिती जाहीर केली आहे.
जडेजा आणि अँडरसनमधील हा वाद 10 जुलैला झाला होता. भारताकडून अँडरसन विरोधात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीवर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. अँडरसनवर तिसर्‍या स्तरावरील आरोप आहे. जर हा आरोप सिध्द झाला तर त्याच्यावर 4 सामन्यांची बंदी लावण्यात येऊ शकते.
दुसर्‍या स्तराचा आरोप आणि पहिल्या स्तराची कारवाई
सामन्याचे रेफरी डेव्हीड बून यांच्या मते या प्रकरणात जडेजाची काहीच चुक नाही. त्याच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. जडेजाचे वागणे खेळ भावनेप्रमाणेच होते. इंग्लंड विरोधात 5 सामन्यांच्या या सिरिजमध्ये भारत 1-0 ने पुढे आहे.