आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ray Price Declared Retirement Form International Cricket

झिम्‍बाब्‍वेच्‍या रे प्राईसचा आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटला अलविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- झिम्‍बाब्‍वेचा भारतविरूद्धच्‍या सुरू असलेल्‍या पाच वनडे मालिकेत अद्याप एकही सामना खेळायला न मिळालेला झिम्‍बाब्‍वेचा डावखुरा फिरकीपटू रे प्राईसने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटला अलविदा म्‍हटले आहे.

37 वर्षीय प्राईस अखेरच्‍या दोन सामन्‍यातही खेळणार नाही. त्‍याने एका क्रिकेट वेबसाईटला दिलेल्‍या मुलाखतीत निवृत्तीची माहिती दिली. तो आपला करार संपण्‍याची वाट पाहत होता.

मी पुढचा सामना खेळणार नसून, मी निवृत्ती घेत आहे, असे त्‍याने म्‍हटले. या मालिकेसाठी प्राईसची सुरूवातीला निवड झाली नव्‍हती. प्राईसने खेळलेल्‍या 102 वनडे मॅचमध्‍ये 100 विकेट तर 22 कसोटीत 80 विकेट घेतल्‍या आहेत. टी-20 क्रिकेटमधील 16 सामन्‍यात त्‍याने 13 विकेट घेतल्‍या आहेत.