(फोटो:डान्स करताना डॅरेन सॅमी, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक आणि विराट कोहली)
इंडीयाचा त्योहार अर्थात आयपीएल-8 क्रिकेट स्पर्धा सुरु झाली आहे. 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि कोलकाता नाइटराइडर्स आमनेसामने येतील. ही लढत होण्यापूर्वी आरसीबीच्या क्रिकेटर्सचा पार्टी टाइम सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल ग्रॅंड मस्ती करताना दिसले.
वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटर डॅरेन सॅमीने (आरसीबी)
आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या पार्टीचे फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये विराट कोहलीसह ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि दिनेश कार्तिक फनी मूडमध्ये दिसत आहेत. दुसर्या एका फोटोमध्ये सगळे क्रिकेटपटू डान्स करताना दिसताय. दरम्यान, कोलकाता नाइटराइडर्सने ओपनिंग लढतील मुंबई इंडियन्सचा 7 विकेट राखून पराभव केला आहे.