आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Readiness Of IPL: Garry Karston Become Captain Of Delhi Daredevils

दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या प्रशिक्षकपदी गॅरी कर्स्टनची नियुक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इंडियन प्रीमियर लीगच्या सातव्या सत्रासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.


भारतीय संघाने 2011 मध्ये दुस-यांदा विश्वचषक पटकावला. कसोटी मानांकनात प्रथम क्रमांकावर झेप घेणा-या भारतीय संघाचे कर्स्टन हे प्रशिक्षक होते. त्यांच्या या यशस्वी कारकीर्दीमुळेच त्यांना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षकपद बहाल करण्यात आले आहे. गत हंगामात थेट आठव्या स्थानावर घसरलेल्या दिल्ली संघाची घसरण रोखणे आणि त्यांना पहिल्या चार संघांपर्यंत किमान मजल मारून देण्याचा त्यांचा मानस आहे. दिल्ली संघात एरिक सिमॉन्स, टी. ए. सेकर, मुश्ताक अहमद हे आपापल्या जागी कायम राहतील.