आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Madrid 9 1 Granada: Ronaldo Hits Five In Easy Win For Blancos

रोनाल्डोच्या हॅट्रिकच्या बळावर रिअल माद्रिदने ग्रेनेडाला ९-१ ने धुतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - ला लिगामध्ये रविवारी क्रिस्टियानो रोनाल्डोचा जलवा बघायला मिळाला. रिअल माद्रिदने रोनाल्डोच्या हॅट्रिकसह पाच गोलच्या बळावर ग्रेनेडाला ९-१ ने धुतले. माद्रिदचा स्ट्रायकर रोनाल्डोने हाफ टाइमच्या आधीच आपली हॅट्रिक पूर्ण केली होती. हाफ टाइमला माद्रिदची टीम ४-० ने आघाडीवर होती. सामन्याचा पहिला गोल स्कॉटिश स्टार गेराथ बेलने २७ व्या मिनिटाला केला. यानंतर रोनाल्डो तळपला. पोर्तुगालच्या या महान खेळाडूने सामन्याच्या ३० व्या, ३६ व्या, ३८ व्या, ५४ व्या आणि ८९ व्या मिनिटाला गोल करून चाहत्यांना खुश केले. याशिवाय फ्रान्सचा करीम बेनजमाने ५२ व्या आणि ५६ व्या मिनिटाला गोल केले, तर मिंजने ८३ व्या मिनिटाला टीमसाठी गोल केला. हा सामना एकतर्फी होईल हे पहिल्या हाफपासूनच स्पष्टपणे दिसत होते. ग्रेनेडाकडून एकमेव गोल ७४ व्या मिनिटाला रॉबर्टने केला.

बार्सिलोना अजूनही टॉपवर
या विजयानंतर रिअल माद्रिदच्या नावे २९ सामन्यांत ६७ गुण झाले आहेत. ला लीगमध्ये माद्रिद दुसर्‍या स्थानी कायम आहे, तर बार्सिलोनाची टीम २८ सामन्यांत २२ विजयासंह ६८ गुणांच्या मदतीने अव्वलस्थानी कायम आहे. दोन्ही संघांत फक्त एका गुणाचे अंतर राहिले आहे. पुढच्या सत्रात दोन्ही संघ विजयीरथ कायम ठेवून टॉपची पोझिशन कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. अ‍ॅटलेटिको ६२ गुणांसह तिसर्‍या, तर वेलेंसिया ६० गुणांसह चौथ्या व सेविला ५८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.