आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Madrid Gets 'La Decima' With Thrilling Champions

रिअल माद्रिदने जिंकला चॅम्पियन्स लीगचा किताब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिस्बान - क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रिअल माद्रिदने रविवारी चॅम्पियन्स फुटबॉल लीगचा किताब पटकावला. रिअल माद्रिदने दहाव्यांदा या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले आहे. या टीमने अंतिम सामन्यात अ‍ॅथलेटिको माद्रिदचा 4-1 ने पराभव केला.
रामोस (90 मि.), गॅरेथ बॅले (110 मि.), मार्सेलो (118 मि.) आणि क्रिस्टियानो रोनाल्डो (120 मि.) प्रत्येकी केलेल्या एका गोलच्या बळावर रिअल माद्रिदने अतिरिक्त वेळेत सामना जिंकला. दिएगो गोडिनने (36 मि.) अ‍ॅथलेटिको माद्रिदकडून केलेला एकमेव गोल व्यर्थ ठरला.
सामन्यांच्या 35 व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अखेर अ‍ॅथलेटिको माद्रिदच्या दिएगो गोडिनने सामन्यात गोलचे खाते उघडले. त्याने 36 व्या मिनिटाला हेडरने गोल करून अ‍ॅथलेटिकोला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रिअल माद्रिदने सामन्यात बरोबरी मिळवण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे अ‍ॅथलेटिको माद्रिद संघ सामना जिंकेल, असेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. अखेर 90 व्या मिनिटाला रामोसने गोल करून रिअल माद्रिदला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली.
रोनाल्डो, मार्सेलो, बॅलेचा धमाका
मिळालेल्या अतिरिक्त वेळेत गॅरेथ बॅलेने गोल करून रिअल माद्रिदला 2-1 ने आघाडी मिळवूून दिली. त्यापाठोपाठ अवघ्या आठ मिनिटांत मार्सेलोने गोल करून टीमच्या आघाडीला 3-1 ने मजबूत केले. दरम्यान, 120 व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर रोनाल्डोने गोल करून 4-1 ने रिअल माद्रिदचा विजय निश्चित केला.