आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियल माद्रिदला मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लेडले - करिम बेन्झेमा (51, 74 मि.) आणि अ‍ॅगेल डी मारिया (15 मि.) यांनी सुरेख गोल करून रियल माद्रिदला मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात विजय मिळवून दिला. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियल माद्रिदने सामन्यात लॉस एंजलिस गॅलेक्सीवर 3-1 ने मात केली. जोस विल्लेरेईलने 63 व्या मिनिटाला गॅलेक्सीकडून केलेला गोल व्यर्थ ठरला.


सामन्याच्या 15 व्या मिनिटाला माद्रिदने गोलचे खाते उघडले. मारियाने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत माद्रिदने 1-0 ने आघाडी कायम ठेवली. त्यानंतर 51 व्या मिनिटाला करिम बेन्झेमाने आघाडीला 2-0 ने मजबूत केले. गॅलेक्सीला सामन्यात पहिला गोल करण्यासाठी 63 व्या मिनिटापर्यंत झुंज द्यावी लागली. अखेर जोसला हे यश गवसले. दरम्यान, बेन्झेमाने 74 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा गोल केला. यासह त्याने संघाचा विजय निश्चित केला. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलरक्षकामुळे शेवटपर्यंत गॅलेक्सीला सामन्यात गोल करता आला नाही.


बायर्न म्युनिचची मँचेस्टर सिटीवर मात
बायर्न म्युनिचने मँचेस्टर सिटीवर 2-1 ने मात केली. माडझुकीकने (73 मि.)केलेल्या गोलच्या बळावर सिटीने सामना जिंकला. दुस-या हाफमध्ये नेग्रेडोने 61 व्या मिनिटाला सिटीकडून पहिला गोल केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत म्युनिचने लढतीत 1-1 ने बरोबरी मिळवली. मुल्लरने 66 व्या मिनिटाला म्युनिचकडून गोल केला होता.