आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Really Sachin Special Man, Amitabh Bachhan Give Certificat

सचिन खरंच स्पेशल माणूस, शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे प्रशस्तिपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे झाली. त्यात सचिन यांनी तब्बल पन्नास वर्षे योगदान दिले. काही स्पेशल लोकच हे काम करू शकतात आणि सचिन हे स्पेशलच आहेत’, असे प्रशस्तिपत्र बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी अभिनेता, दिग्दर्शक सचिनला दिले. ‘त्यांचे आडनाव उच्चारणे मात्र मला जमले नाही’, अशी प्रांजळ कबुलीही बिग बींनी दिली.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा विविध भूमिकेत सिनेसृष्टीवर पन्नास वर्षे अधिराज्य गाजवणारे सचिन पिळगावकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन गुरुवारी रात्री अमिताभ, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सोहळ्याला चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. यात अभिनेते आशुतोष राणा, रेणुका शहाणे, सुलोचनादीदी, सुरेश वाडकर, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, शंकर महादेवन, सोनू निगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संगीतकार शंकर महादेवन म्हणाले, लहानपणापासून मी सचिनला पाहतोय. तो अनेक कलांचे आगार आहे. त्यांना संगीताचीही चांगली जाण आहे. भविष्यात मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. दिग्दर्शक रमेश सिप्पी म्हणाले, सचिन अजूनही लहानच दिसतो. गेल्या पन्नास वर्षांत त्याने मोठी प्रगती केली आहे. ‘मैं गाऊं तुम सो जाओ’ या गाण्यात त्याने प्रेक्षकांना खूप रडवले. रिअल लाइफमध्ये मात्र प्रत्येकाला हसवलेच.