आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reason Why Australia Lost 3 Test Vs India Clarke

PHOTOS : ऑस्‍ट्रेलियाच्‍या पराभवाचे हे पाच \'खलनायक\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहालीच्‍या मैदानावर यजमान टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्‍जा मिळवला. ऑस्‍ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्‍यातील कसोटी इतिहासात टीम इंडियाने एका मालिकेत कांगारूंना सलग तीन सामन्‍यात पराभूत करण्‍याची ही पहिलीच वेळ होती.

मालिकेतील शेवटचा सामना दिल्‍लीमध्‍ये होणार असून या सामन्‍यात कर्णधार मायकल क्‍लार्कच्‍या पाठदुखीने मान वर काढल्‍याने त्‍याचे खेळणे अनिश्चित आहे. मोहाली कसोटीतून निलंबित करण्‍यात आलेल्‍या शेन वॉटसनवर नेतृत्‍वाची धुरा सोपवली जाऊ शकते.

मायदेशात टीम इंडियाला 4-0 ने पराभूत करणा-या कांगारूंना भारतीय फिरकीपटूंनी उघडे पाडले. भारताच्‍या दौ-यावर येण्‍यापूर्वी धोनी ब्रिगेडचा पराभव करू अशी दर्पोक्‍ती करणा-या क्‍लार्कची घमेंड टीम इंडियाने उतरवली.

तिन्‍ही कसोटीत ऑस्‍ट्रेलियन संघ टीम इंडियाशी संघर्ष करताना दिसले नाही. चालू मालिकेत ऑस्‍ट्रेलियाच्‍या पराभवाचे तीन मुख्‍य खलनायक समोर येतात. या तिघांमुळे ऑस्‍ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला.

खुद्द कर्णधार मायकल क्‍लार्क, प्रशिक्षक मिकी आर्थर आणि क्रिकेट ऑस्‍ट्रेलिया. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या ऑस्‍ट्रेलियन संघाच्‍या पराभवाची कारणे...