आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reasons Behind Team India's Failure In Securing Win Over South Africa

टीम इंडियाच्‍या या चुकांमुळे आली होती नामुष्‍कीची वेळ, नशीबामुळेच वाचली लाज...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्‍सबर्ग कसोटीत नशीबानेच भारताची लाज राखली असेच म्‍हणावे लागेल. तब्‍बल 458 धावांचे आव्‍हान देऊनही भारतावर पराभवाची नामुष्‍की ओढावण्‍याची शक्‍यता निर्माण झाली होती. तसे घडले असते तर हा कसोटीमध्‍ये विक्रमी पाठलाग ठरला असता. भारताला विजयाची संधी होती. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्‍या फलंदाजांची झुंझार खेळी आणि भारतीय गोलंदाजांची केलेली भंगार गोलंदाजी, यामुळे सामना वाचविणे अवघड झाले होते. भारतीय खेळाडुंनी केलेल्‍या काही चुकांचा मोठा फटका बसला. अन्‍यथा निकाल वेगळा लागला असता. एक गोष्‍ट मात्र नक्‍की. ती म्‍हणजे, सामना अतिशय रंगतदार झाला. पाचही दिवस उत्‍कंठावर्धक ठरले. दोन्‍ही संघांना समान संधी मिळाली.

भारतासाठी या सामन्‍यात विजय महत्त्वाचा ठरला असता. वन डे सामन्‍यांच्‍या मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला होता. त्‍यामुळे कसोटीतील विजय निश्चितच दिलासा देणारा ठरला असता. सामन्‍यातील 4 दिवस भारताने वर्चस्‍व राखले होते. परंतु, पाचव्‍या दिवशी ए. बी. डिव्‍हीलियर्स आणि फॅफ ड्युप्‍लेसिस जोडीने शतके ठोकून सामन्‍याचा नूरच पालटला. त्‍यामुळे सामना वाचविण्‍यासाठी भारताला शर्थीचे प्रयत्‍न करावे लागले.

ही स्थिती का आली? कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्‍या कोणत्‍या चुका भारी पडल्‍या.... जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये..