आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेबेकाने सरावासाठी ट्विटर केले लॉग ऑफ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडची स्टार जलतरणपटू रेबेका एडलिंग्टन आगामी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. रोजच्या सरावात मग्न असल्यामुळे तिने ट्विटरपासून दोन महिने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन ऑलिम्पिक प्रारंभ होण्यास अवघे 55 दिवस उरले आहेत. या अल्पावधीत कसून सराव करण्यावर अधिक भर देण्याचा निर्धार तिने केला आहे. ट्विटरवर तिचा तब्बल 50 हजारांपेक्षा अधिक मित्रपरिवार आहे. ट्विटरवर चाहत्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मनावर प्रचंड दडपण येऊ शकते. त्याचा विपरीत परिणाम कामगिरीवर होऊ शकतो. निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हा सर्वात मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. या निराशेला टाळण्यासाठी ट्विटरचा वापर न करण्याचा निर्णय योग्य असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

दोन पदकांवरचे वर्चस्व राखून ठेवणार
बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत रेबेकाने दोन सुवर्णपदके पटकावली होती. हे वर्चस्व राखून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे. यासाठी दोन महिने ट्विटरचे अकाउंट उघडणार नाही. मनाची पूर्ण तयारी करून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सराव व निश्चित केलेले ध्येय गाठण्यावर रेबेका लक्ष्य केंद्रित करणार आहे. माझा आत्मविश्वास व एकाग्रतेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही, यावर माझा अधिक भर असल्याचेही ती म्हणाली.

‘मूर्ती लहान, कीर्ती महान’
इंग्लंडची रेबेका ही वयाने सर्वात लहान आहे. मात्र तिने आपली कीर्ती सातासमुद्रापार वाढवली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिने 19 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिने दोन सुवर्णपदके पटाकावली होती. तिने 8.14.10 सेकंदांत 800 मीटर फ्रीस्टाइलची स्पर्धा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. याचबरोबर जेनेट इवासच्या नावावर असलेला जुना विक्रमही मोडला. 1988 नंतर ती इंग्लंडची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन ठरली होती. 100 वर्षांतील सर्वात यशस्वी इंग्लंडच्या जलतरणपटूचा बहुमानही तिने पटकावला.

तीन टन वजनांच्या ऑलिम्पिक रिंग्ज
ग्लास्गो येथे गुरुवारी सर्वात मोठय़ा ऑलिम्पिक रिंग्सचे अनावरण करण्यात आले. या रिंग्स तब्बल 3 टनांपेक्षा अधिक वजनदार आहेत. 16 फूट उंच व 33 फूट लांब अशा या रिंग्ज आहेत. या रिंग्ज जॉर्ज स्क्वायर येथे लावण्यात आल्या आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते याचे अनावरण केले गेले. ग्लास्गो येथील हॅम्पडेन मैदानावर ऑलिम्पिकमधील आठ फुटबॉलचे सामने खेळवले जाणार आहेत.