आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Recently Sakshi Dhoni Shared A Photo In CSK Dress To Show Her Love For That Team

पत्नी साक्षीचे हे जुने आंधळे प्रेम धोनीला पडले महागात, मिळाली ही शिक्षा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षीचे चेन्नई सुपरकिंग्जवरचे जुने प्रेम धोनीला चांगलेच महागात पडले आहे. - Divya Marathi
साक्षीचे चेन्नई सुपरकिंग्जवरचे जुने प्रेम धोनीला चांगलेच महागात पडले आहे.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये मंगळवारी रायजिंग पुणे सुपरजाइंट आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात मॅच झाली. पुण्याचा नियमित कर्णधार स्टीव स्मिथ आजारी असल्याने त्याच्या अनुपस्थितीत या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेने नेतृत्त्व केले. क्रिकेट फॅन्सला मात्र यामुळे धक्का बसला कारण धोनी असतानाही रहाणेकडे कर्णधारपद सोपवले. याचे कारण हे मानले जात आहे की, साक्षी धोनीने शेयर केलेला एक फोटो. सोबतच साक्षीने हर्ष गोयंकांना एका पोस्टद्वारे अप्रत्यक्ष उत्तर दिले होते. CSK वर साक्षीचे अतिप्रेम कशासाठी....
 
- एमएस धोनीची पत्नी साक्षीने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर केला होता. ज्यात ती IPL मधून सस्पेंड असलेली टीम चेन्नई सुपरकिंग्सचे हेल्मेट आणि ड्रेस घातलेली दिसत आहे. 
- हा फोटो शेयर करताना साक्षीने त्यावर कॅप्शन लिहले होते की, #throwback !!. याबाबत सांगितले जात आहे की, याच फोटोमुळे व तिच्या चेन्नई सुपरकिंग्सवरचे प्रेम बघता कालच्या सामन्यात धोनीऐवजी रहाणेंकडे नेतृत्त्व दिले गेले.
- तर, साक्षीच्या या फोटोला पुणे टीमचे को-ओनर हर्ष गोयंका यांनी केलेल्या ट्वीटला दिलेले उत्तर मानले जात आहे, ज्यात त्यांनी धोनीला दुय्यम दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पुणे टीमचे को-ओनरने काय टि्वट करत धोनीला केले होते लक्ष्य...
बातम्या आणखी आहेत...