आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Record breaker Finch Stars As Australia Win At Last

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एरोन फिंचचे विक्रमी शतक, 200 दिवसांनी ऑस्‍ट्रेलियाने चाखली विजयाची चव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथम्‍प्‍टन- इंग्‍लंडकडून नामुष्‍कीजनक परभव पत्‍कारणा-या ऑस्‍ट्रेलियाने तब्‍बल 200 दिवसांनी विजय मिळविला. या विजयात धडकेबाज फलंदाज ऍरोन फिंचचा मोठा वाटा होता. त्‍याने फक्त 63 चेंडुंमध्‍ये 156 धावांची बरसात करुन कांगारुंच्‍या विजयाचा पाया रचला. हा सामना जिंकण्‍यासाठी ऑस्ट्रेलियाच्‍या गोलंदाजांनाही बराच खटाटोप करावा लागला. अखेर 39 धावांनी इंग्‍लंडचा पराभव झाला.

फिंचच्‍या धडाकेबाज शतकाच्‍या जोरावर ऑस्‍ट्रेलियाने 248 धावांपर्यंत मजल मारली. इंग्‍लंडनेही दमदार प्रत्‍युत्तर दिले. जो रुटने नाबाद 90 धावांची दमदार खेळी केली. मात्र, इंग्‍लंडला 209 धावाच काढता आल्‍या. फिचचे शतक टी20 क्रिकेटमध्‍ये दुसरे वेगवान शतक आहे. ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटमध्‍ये त्‍याचे शतक सर्वाधिक वेगवान ठरले. तसेच आंतरराष्‍ट्रीय टी20 क्रिकेटमधील ही सर्वोच्‍च वैयक्ति‍क खेळी आहे.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा सविस्‍तर वृत्तांत...