» Record Of Ten Players Out By Vikas

दहा गडी बाद करण्याचा विकासचा विक्रम..!

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 00:37 AM IST

  • दहा गडी बाद करण्याचा विकासचा विक्रम..!

नवी दिल्ली - कोणत्याही सामन्याच्या एका डावात सर्व दहा विकेट घेण्याचा पराक्रम जगातल्या खूप कमी गोलंदाजांना करता आला आहे. दिल्लीचा 16 वर्षीय युवा ऑफस्पिनर विकास दीक्षितने डीडीसीए लीग क्रिकेट सामन्याच्या एका डावात सर्व दहा गडी बाद करण्याचा भीमपराक्रम केला. विकास दीक्षितने केजी कोल्ट्सकडून खेळताना डीटीसी टीमविरुद्ध ही कामगिरी केली. केजी कोल्ट्सने निर्धारित 45 षटकांत 7 बाद 309 धावांचा विशाल स्कोअर केला. प्रत्युत्तरात डीटीसी टीमचा डाव 30.4 षटकांत 87 धावांत आटोपला. विकासमुळे त्याच्या संघाने तब्बल 222 धावांनी सामना जिंकला. विकासने सामना एकतर्फी ठरवला.

Next Article

Recommended