आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड बुलचा डॅनियल रिसिआर्डो चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माँट्रियल- मागील मोसमापासून गाजत असलेले मर्सिडीझचे वर्चस्व मोडून काढत रेड बुलच्या डॅनियल रिसिआर्डोने कॅनडियन ग्रँड प्रिक्समध्ये बाजी मारली. थरारक आणि अपघातांच्या घटनांनी गाजलेल्या या शर्यतीत रिसीआर्डोने सर्वांना मागे टाकत विजेतेपद पटकावले.

मर्सिडीझचा लेविस हॅमिल्टन व पोल पोझिशनचा दावेदार निको रोसबर्गला अखेरच्या टप्प्यात आलेल्या गाडीतील समस्येचा लाभ रिसिआर्डोने उठवला. त्यामुळे रोसबर्ग दुसर्‍या स्थानी तर रेड बुलचाच सेबेस्टियन व्हेटल तिसर्‍या स्थानी राहिला.

दोन कारची टक्कर
शर्यतीमधील अखेरच्या लॅपमध्ये फोर्स इंडियाचा मेक्सिकन चालक सर्जिओ पेरेझ आणि विल्यम्स सॉचा फेलिप मासा यांच्या कार एकमेकांना अत्यंत वेगात धडकल्या. सुमारे 240 किलोमीटर वेगाने चालणार्‍या या गाड्या धडकल्याने उंच हवेत उडाल्या. मात्र सुरक्षा यंत्रणा प्रभावी असल्याने दोन्ही चालकांना किरकोळ इजा वगळता फारशी दुखापत झाली नाही.
० कॅनडियन ग्रांप्रीची फॉर्म्युला-1 ची रेस जिंकल्यांनंतर डॅनियल रिसिआर्डोने ट्रॉफी उंचावून आपला आनंदोत्सव साजरा केला.