आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सेपांग - गत वेळचा विश्वविजेता सेबेस्टियन वेटलने रविवारी मलेशियन ग्रांप्रि फॉर्म्युला वन रेसिंग कार स्पर्धा जिंकली. रेडबुलच्या या स्टार ड्रायव्हरने 1:38:56.681 सेकंदात निश्चित अंतर पूर्ण केले. रेड बुलचाच मार्क वेबर दुसर्या स्थानी राहिला. गत आठवड्यात ऑस्ट्रेलियन ग्रांप्रि जिंकणारा लोटसचा किमी रेकिननला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
रेडबुलच्या वेटलने यंदाच्या सत्रातील दुसर्या फॉर्म्युला वन रेसिंग स्पर्धेत अव्वलस्थान गाठले. त्याने शनिवारी हॅम्लिटन, रोसबर्ग आणि अलोन्सोला पिछाडीवर टाकून पोल पोझिशन मिळवली होती. ही कामगिरी राखून ठेवत त्याने फायनलमध्ये बाजी मारली. माजी वर्ल्ड चॅम्पियन लेव्हिस हॅमिल्टनने तिसरे स्थान गाठले. त्याने चौथ्या स्थानी असलेल्या रोसबर्गला मागे टाकून तिसर्या स्थानावर धडक मारली. फेरारीचा फिलीप मासा पाचव्या आणि फ्रान्सचा रोमिन ग्रोसजिनने सहावा क्रमांक पटकावला.
आदेश नाकारला
शर्यत अखेरच्या टप्प्यात असताना मार्क वेबर पहिल्या आणि वेटल दुसर्या स्थानावर होता. मात्र, आघाडीवर असलेल्या वेबरला ओव्हरटेक करून पुढे न जाण्याचा आदेश आदेश रेड बुल संघ व्यवस्थापनाने वेटलला दिला. त्याने हा आदेश धुडकावला आणि जोखीम घेत वेबरला ओव्हरटेक करून पहिला क्रमांक मिळवला. त्याचा हा निर्णय फायदेशीर ठरला. गत विजेत्या या जर्मन ड्रायव्हरने या सत्राचा पहिला विजय मिळवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.