आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Jio To 4G Fy Wankhede Stadium For IPL Matches News In Marathi

IPL-8 चा थरार रंगणार 8 एप्रिलपासून, क्रिकेट प्रेक्षकांना मिळेल 4G Wi Fi सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचे आठवे सत्र येत्या 8 एप्रिलपासून सुरु होत आहे. यंदा
344 क्रिकेटपटूंचा लिलाव झाला असून अष्टपैलू युवराज सिंग हा सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. दिल्ली डेअरडेव्हिलने सुमारे 16 कोटींच्या मानधनासह संघात घेतले आहे. युवीने 2011 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या विश्वचषक -2015 मध्ये युवीला डच्चू देण्यात अाला होता.

'आयपीएल-8' अनेक मुद्यांमुळे चर्चेत आले आहे. या सत्रात अनेक बदल दिसून येत आहेत. अनेक द‍िग्गज क्रिकेटपटूंनी यंदा क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. दुसरीकडे अनेक क्रिकेटपटूंचे संघ बदलले आहे. त्यामुळे आयपीएल-8 मध्ये रोमांच दिसणार आहे. आयपीएल-8 मधील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे, अष्टपैलू युवराज सिंह हा दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळत आहे.

विद्यमान विजेते कोलकाता नाईट रायडर्स व माजी विजेते मुंबई इंडियन्स सलामीच्या लढतीत आमनेसामने भिडतील. यंदाची आयपीएल स्पर्धा 47 दिवस चालणार असून त्यात 4 प्लेऑफ लढतीसह एकूण 60 सामने होणार आहेत.

DDला लाभेल युवीची साथ...
युवराज सिंह 2014 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळला होता. यंदा युवी दिल्लीतील ब्ल्यू-रेड जर्सीमध्ये दिसणार आहे. 2014 मध्ये युवीला आरसीबीने 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, माहेला जयवर्धने आणि केविन पीटरसन आदी दिग्गज क्रिकेटपटूंनी दिल्ली डेअरडेविल्सचे यापूर्वी नेतृत्त्व केले आहे. दिल्ली डेअरडेविल्सने 2009 आणि 2012 मध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. युवराज सिंह, अमित मिश्रा, जेपी डुमिनी (कर्णधार) आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. तरीही दिल्लीला विजेतेपदाची प्रतिक्षा राहिली आहे.
दिल्ली डेअरडेविल्सच‍ी आतापर्यंतची वाटचाल...
दिल्ली डेअरडेव्हिल्स लढत विजय पराभव अनिर्णित ओव्हर ऑल प्लेस
2008 14 7 6 1 4th
2009 14 10 4 0 सेमीफायनल
2010 14 7 7 0 5th
2011 14 4 9 1 10th
2012 16 11 5 0 सेमीफायनल
2013 16 3 13 0 9th
2014 14 2 12 0 8th
DD आला या आहेत अपेक्षा...
सद्यस्थितीत दिल्ली संघाचा फॉर्म उत्तम आहे. दिल्ली संघाने रणजी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आरसीबीने पुन्हा एकदा युवीला मिळवण्यासाठी चांगली बोली लावली होती. परंतु DDने 16 कोटी रुपये देऊन युवीला आपल्या चमूत सहभागी करून घेतले आहे.
यंदा DD मध्ये अनेक बदल दिसणार आहेत. युवराज सिंह सारखा अनुभवी क्रिकेटपटू यंदा दिल्लीकडून खेळणार आहे.
दिल्ली डेअरडेविल्स संघ:
युवराज सिंह, झहीर खान, मोहम्मद शमी, मनोज तिवारी, केदार जाधव, मयंक अग्रवाल, शहबाज नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, अमित मिश्रा, जयदेव, उनादकत, श्रेयस अय्यर, सीएम गौतम, श्रीकर भरत, केके जेयस, डोमनिक जोसेफो जेपी डुमिनी (कर्णधार), क्विंटन डि कॉक, इमरान ताहिर, नाथन कोल्टर, अँजिलो मॅथ्यूज, गुरिंदर संधू, ट्राव्हिस हेड, एल्बी मोर्कल, मॉर्कस स्टोइनिस.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या स्टेडिअमवर मिळेल 30 हजार क्रिकेट चाहात्यांना 4G वाय-फाय सुविधा...