आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतला सचिन : आदर्शांचा आदर्श सचिन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल 24 वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवणारा सचिन तेंडुलकर खेळावरील प्रामाणिक निष्ठा, समर्पणभाव, एकाग्रता आणि सातत्य या गुणविशेषांमुळे तो इतर खेळांतील अनेक दिग्गज कीर्तिवंतांचेही प्रेरणास्थान बनला आहे....!!
आत्मचिंतनाचा ग्रेट मार्गदर्शक : सायना नेहवाल
सायना नेहवाल बॅडमिंटन खेळात एवढी मश्गूल असते की तिला अन्य गोष्टींकडे लक्ष द्यायलाही वेळ लागतो. ती क्रिकेट फारसे पाहत नाही. मात्र, ‘मोटिव्हेशन’साठी सचिन तेंडुलकर खेळत असताना तो क्रिकेट सामना आवर्जून बघते. सायनाचे विविध खेळांमधील हीरो आहेत, ‘आयडॉल’ आहेत. सचिन तेंडुलकर हा तिचा क्रिकेटचा ‘आयडॉल’ आहे. एरवी, वर्ल्डकप किंवा तत्सम क्रिकेट स्पर्धांचे सामने ती पाहते. टेनिसमधील तिचा आयडॉल रॉजर फेडरर आहे. जलतरणातला तिचा हीरो आहे मायकल फेल्फ. हे सर्व जण प्रतिकूल परिस्थितीतून कसे मार्ग काढतात त्याचे अवलोकन करायला सायनाला आवडते. सचिनबाबत सायना फारच आदराने बोलते. ती म्हणते, क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या मोठ्या मैदानांवर खेळल्या जाणा-या खेळांमध्ये स्वत:च स्वत:चा मार्ग काढायचा असतो. कारण तुमचे प्रशिक्षक तुमच्यापासून दूर असतात. तेव्हाच तुमच्या मानसिकतेची, धैर्याची खरी कसोटी लागते. अशा वेळी मी स्वत:शीच संवाद साधून स्वत:ला प्रेरित करीत असते. आत्मसंवाद आणि आत्मचिंतन या दोन गोष्टी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या असतात. हे सचिनकडून मी शिकले आहे. सचिनच्या निवृत्तीमुळे फक्त क्रिकेट या खेळावरच परिणाम होईल असे नाही, तर देशातील अन्य खेळाडूंनादेखील त्याच्या निवृत्तीचा अप्रत्यक्ष फटका बसणार आहे. सचिनच्या सहकार्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन लीगमध्ये नवी संकल्पना यशस्वी करता आली. त्यांच्या नावाच्या वलयाचा बॅडमिंटन खेळाला फायदा झाल्याचे मी पाहिले आहे. सचिनने माझ्यासह अनेक युवा खेळाडूंना भेटून प्रोत्साहित केले.
(सायना भारताची पहिली ऑलिम्पिक
बॅडमिंटन पदकविजेती खेळाडू आहे.)