आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rememory Of Sachin Tendulkar: Close Friend Of Krishan Sudama

आठवणीतील सचिन: कृष्ण-सुदाम्याची जिवलग मैत्री कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ते 1988 चे वर्ष असावे. चुणचुणीत सचिन एका स्पर्धेत मुंबईकडून खेळायला आला तो मुंबईचा कप्तान म्हणूनच. व्हीसीएत कामाला असलेला 17 वर्षे वयाचा नरेश वाघमोडे मुंबई संघाच्या व्यवस्थेत होता.
सचिनला सराव देण्यासाठी बॉलिंग करण्यापासून त्याच्या जेवणाची सारी व्यवस्था नरेशने सांभाळली होती. सायंकाळच्या फुरसतीच्या क्षणी लहानग्या सचिनला आमदार निवासाच्या आवारात स्वत:च्या सायकलवर फिरवल्याचे क्षण आजही नरेशच्या स्मृतिपटलावर कायम आहेत. अगदी तेव्हापासून सचिन आणि नरेश हे जिगरी दोस्त बनले आहेत.
नरेश आता नागपुरातील जयताळा परिसरात कुटुंबासह राहतो. पण, तो कायम सचिन व त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असतो. नागपुरात येताच सचिन तेंडुलकर नरेश कुठे आहे, मला त्याला भेटायचेय, अशी विनंती व्हीसीएच्या पदाधिकाºयांकडे नेहमी करतो. नोकरीच्या निमित्ताने मुंबईतील दीड वर्षाच्या वास्तव्यात नरेशचा मुक्काम सचिनच्या कलानगर येथील साहित्य सहनिवास या निवासस्थानीच असायचा.
सचिनसाठी नरेशचा खास डबा
सचिन नागपुरात येतो त्या वेळी त्याला जेवणाचा खास डबा पोहोचवण्याची जबाबदारी नरेशवर असते. खाºया पाण्यात उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा सचिनला फार आवडतात. त्यामुळे नागपुरात आला की ती त्याची खास डिमांड असते. सचिनसह धोनी आणि जहीरही त्यात हमखास वाटेकरी असतात. सचिन अत्यंत मनमिळाऊ असल्याचे तो म्हणतो.