आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिओ’ला आता चढतोय ऑलिम्पिकचा रंग !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आता साऱ्या सेवा २४ तासांच्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थेट विमानतळावरून एमपीसी म्हणजे पत्रकारांची कामाची मुख्य जागा असलेल्या ठिकाणी मध्यरात्रीही जाग होती. टेलिव्हिजन कंपन्या आणि त्यांचे तंत्रज्ञ, वार्ताहर यांची चोवीस तासांची सेवा सुरू झाली आहे. वातावरण ऑलिम्पिकसाठी आता खऱ्या अर्थाने तापू लागले आहे.

यजमान असूनही उत्साही नसलेल्या रिओच्या प्रेक्षकांमुळे यंदाचे ऑलिम्पिक आगळेवेगळे ठरण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक स्टेडियम्स चकाचक असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्व सोयी उत्तम आणि कार्यरत आहेत. आर्थिक राजधानी साओ पावलोमध्येही ऑलिम्पिक 'सोव्हिनिअर्स शॉप’चा अपवाद वगळता ऑलिम्पिकचे नामोनिशाण नाही. रिओ विमानतळावर आल्यावर या शहरात काहीतरी वेगळे होत आहे, याची जाणीव होते. इमिग्रेशनसाठी स्वतंत्र कक्ष, ऑलिम्पिक कुटुंबातील म्हणजे गळ्यात अधिस्वीकृती असणाऱ्या प्रत्येकाला ‘व्हीआयपी’ वागणूक मिळतेय. ऑलिम्पिकसाठी आलेल्या प्रत्येकाला मदत करण्याची मानसिकता दिसून येते. विमानतळावर ऑलिम्पिकच्या, ब्राझीलचा आवडता हिरव्या-पिवळ्या-लाल रंगसंगतीचे टी शर्ट््स घालून फिरणारी चुणचुणीत मुले पाहून आता खरोखरच वाटतं की ऑलिम्पिक तोंडावर आलंय. कार्यकर्त्यांचीही वर्दळ वाढली, याचे प्रमुख कारण म्हणजे येथील सर्व शाळा-महाविद्यालयांना एक ऑगस्टपासून देण्यात आलेली खास ऑलिम्पिक सुटी. मुलं-मुली, युवक-युवती उत्साहात पाहुण्यांना मदत करायला पुढे येत आहेत. सुहास्य वदनाने स्वागत करायला पैसे लागत नाहीत. दिवाळखोरी घोषित केलेल्या रिओच्या तिजोरीतील हीच आनंदी, उत्साही मुले-युवक-युवती शिल्लक संपत्ती आहे.

विमानतळावर ऑलिम्पिक बोधचिन्हांच्या पायांचे ठसे तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्या ठशांचा मागोवा घेत घेत पुढे जायचं. चुकायला होणार नाही. येथे भाषेची अडचण मोठी आहे. चीनने ऑलिम्पिक भरविले तेव्हा ती समस्या उद््भवेल, असे वाटले होते. त्यापेक्षाही येथे गंभीर समस्या आहे. कॉलेजची मुले ही कमतरता दूर करण्याचा सध्या प्रयत्न करताहेत. त्यामुळे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांना येथे फारच महत्त्व प्राप्त झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...