आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Requests For The Wrestling In Olympics To International Olympic Committee

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या समावेशासाठी आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीला विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2020 मध्ये होणा-या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळाचा समावेश मध्यवर्ती खेळ म्हणून कायम राहावा, अशी मागणी भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे (आयओसी) करण्यात आली आहे. त्यासाठी आयओसीकडे क्रीडा मंत्रालयाने संपूर्ण सभासदत्वाची मागणी केली आहे.


अथेन्स येथे 1886 मध्ये झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्येदेखील फ्रीस्टाइल आणि ग्रीकोरोमन कुस्तीचा समावेश होता, अशा आशयाचे पत्र क्रीडा सचिव पी. के . देव यांनी आयओसीच्या सर्व क्रीडा सदस्यांना लिहिले आहे. पहिल्या ऑलिम्पिकपासून तो एक प्रमुख खेळ म्हणून खेळला गेला आहे. आधुनिक काळातही कुस्तीला जगभरात प्रचंड प्रतिसाद असून या खेळाची लोकप्रियता आजही कायम आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत जगातील 71 देशांचे मल्ल सहभागी झाले होते. त्यावरून त्याची लोकप्रियता मोजणे शक्य असल्याचेही देव यांनी नमूद केले आहे. 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश न केल्यास या खेळावर दूरगामी परिणाम होणार असून त्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.