आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Require Improvement In Batting Says Cameron White

फलंदाजी सुधारण्याची गरज: कॅमरून व्हाईट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आम्ही आतापर्यंत दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली असली तरीही आमच्या फलंदाजांनी फलंदाजी सुधारण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून व्हाइटने व्यक्त केली. या दोन्ही सामन्यात आम्ही अपेक्षेनुसार फलंदाजी करू शकलो नाहीत. आम्ही चांगली फलंदाजी करून मोठा स्कोअर उभा केला तर गोलंदाजांचे काम थोडे सोपे होईल. आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत.

आता फलंदाजांनी सामना आपल्या हाती घेण्याची गरज आहे. यात माझा सुद्धा समावेश होतो. मी सुद्धा अधिक चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे. असे झाल्यास याचा फायदा टीमलाच होईल, असेही त्याने नमूद केले. रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये व्हाइटच्या दोन उत्तुंग षटकारामुळेच हैदराबादला विजय मिळवता आला.