Home »Sports »From The Field» Rest Of India In Complete Control After Ambati Rayudu Century

इराणी ट्रॉफी : अंबाती रायडूचे नाबाद शतक

वृत्तसंस्था | Feb 10, 2013, 04:00 AM IST

  • इराणी ट्रॉफी : अंबाती रायडूचे नाबाद शतक

मुंबई - अंबाती रायडूच्या (नाबाद 118) शतकी खेळीच्या बळावर शेष भारत संघाने दुस-या डावात 4 बाद 296 धावा काढून इराणी करंडकात आपला विजय निश्चित केला आहे. शेष भारताकडून मनोज तिवारीनेसुद्धा 69 आणि सुरेश रैनाने नाबाद 40 धावा काढल्या. रायडूने मनोज तिवारीसोबत 140 धावांची आणि नंतर रैनासोबत अभेद्य 89 धावांची भागीदारी केली.

रायडूचे हे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 14 वे शतक ठरले. वानखेडे स्टेडियमवर सामन्याच्या चौथ्या दिवशी शेष भारताच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच धडा शिकवला. चौथ्या दिवसअखेर शेष भारताकडून एकूण 413 धावांची आघाडी झाली होती. अद्याप त्यांनी आपला डाव घोषित केलेला नाही. एकूणच परिस्थिती पाहता 10 फेब्रुवारी रोजी रणजी चॅम्पियन मुंंबईसाठी या सामन्यात विजय मिळवण्याची शक्यता दिसत नाही.

शेष भारताने सकाळी 1 बाद 27 धावांवरून पुढे खेळण्यास सुुरुवात केली. पहिल्या डावातील शतकवीर मुरली विजय 18 आणि नाइट वॉचमन श्रीसंत 7 धावांवर खेळत होते. दोन्ही फलंदाजांनी संघाचा स्कोअर 60 धावांपर्यंत पोहोचवला. श्रीसंतला रोहित शर्माने धावबाद केले. श्रीसंतने 56 चेंडूंचा सामना करताना तीन चौकारांसह 18 धावा काढल्या.
श्रीसंत बाद झाल्यानंतर मुरली विजयसुद्धा जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर विजयने रोहितकडे झेल दिला. विजयने 61 चेंडूंत 35 धावा काढताना 5 चौकार मारले. शेष भारताची तिसरी विकेट 67 च्या
स्कोअरवर पडली.

यानंतर मनोज तिवारी (69) आणि रायडू (नाबाद 118) यांनी चौथ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामन्यात पुनरागमन करण्याच्या मुंबईच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले.

शानदार शतक ठोकल्यानंतर तिवारी दाभोळकरच्या चेंडूवर वसीम जाफरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 166 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 69 धावा काढल्या. रायडू आणि पहिल्या डावातील शतकवीर सुरेश रैनाने यानंतर मुंबईला आणखी विकेट मिळवू दिली नाही. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी शेष भारताचा स्कोअर 4 बाद 296 धावा असा झाला होता. मुंबईकडून धवल कुलकर्णी, ठाकूर आणि दाभोळकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

रायडूचा क्लास - या शतकी खेळीदरम्यान अंबाती रायडूने आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवला. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करतानाच त्याने फिरकीलाही दमदार उत्तर दिले. कसोटी सामन्यासाठी आपले तंत्र उत्तम असल्याचे त्याने यात शतकी खेळीने दाखवून दिले.

Next Article

Recommended