आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Revi Shastri Ready To Guide India Team For World Cup, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रवी शास्त्री विश्वचषक स्पर्धेसाठी मार्गदर्शक ?, बीसीसीआयकडून जबाबदारी स्वीकारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी जेवढे काही मला करता येणे शक्य आहे, ते मी निश्चितच करीन. भारतीय क्रिकेट संघाचा मार्गदर्शक, वाटाड्या, मेंटॉर किंवा तत्सम भूमिका बजावायला मला आवडेल. त्यासाठी मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे. याआधी केलेल्या वचनपूर्तीसाठी मी बांधील असल्यामुळे मला भारतीय क्रिकेटच्या प्रमुखांशी वैयक्तिकरीत्या बोलावे लागेल. त्यानंतरच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणा-या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारण्याबाबत मी निर्णय घेऊ शकेन.
मात्र भारतीय क्रिकेटच्या भवितव्याच्या दृष्टीने सकारात्मकच भूमिका असेल, असे रवी शास्त्रींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाने बाजूला केलेले बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या गावातच कार्यकारी मंडळाची बैठक होत आहे. अर्थ समितीची बैठक तेथे होऊन वार्षिक हिशेबांना, अर्थसंकल्पांना त्यात मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर दुपारी कार्यकारिणीची बैठक होणार आहे. संजय बांगर, बी. अरुण, आर. श्रीधर यांना विश्वचषकापर्यंत सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करणे, तसेच अन्य सहायकांच्या नियुक्तीवरही कार्यकारिणीत शिक्कामोर्तब होणार आहे.

शिवलाल यादव संभ्रमावस्थेत!
न्यायालयाने नियुक्त केलेले अध्यक्ष शिवलाल यादव महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या करू शकतात किंवा नाही, याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. सभेचे आयोजन करणे गरजेचे असताना श्रीनिवासन यांच्या आगामी अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठीचा रचलेला डाव आज किती कितपत यशस्वी होतो, हे पाहणे रंजक ठरेल.

आज चेन्नईत बैठक
शुक्रवारी बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळाची बैठक चेन्नईत होणार आहे. त्या बैठकीनंतरच मी बीसीसीआयच्या प्रमुख पदाधिका-यांशी वैयक्तिक पातळीवर, प्रत्यक्ष भेटूनच बोलणार आहे. माझ्या मर्यादा, अडचणी त्यांना सांगूनच मग भूमिका कोणती स्वीकारायची याबाबत निर्णय घेणार आहे, असे सध्या बंगलोर येथे चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या समालोचनासाठी दाखल झालेले रवी शास्त्री पुढे म्हणाले.