आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्यासाठी रिओमध्ये 10 पदके,अशक्य नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिक मध्ये आपण सुवर्णपदकासाठी फारच उत्सुक होतो. मात्र आपल्या खेळाडूंनी आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत एकू ण सहा पदके पटकावली. दोन रौप्य व चार कांस्य. हे फारसे समाधानकारक नसले तरी विजयाचा जल्लोष करण्याच्या लायकीचे आहे.
मला 2016 रिओ द जानेरिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आशेचा किरण दिसत आहे. भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये हळूहळू मात्र समाधानकारक अशी सुधारणा होत आहे. आपल्याला अथेन्समध्ये एकच पदक मिळाले होते. त्याच्या चार वर्षांनंतर बीजिंग ऑलिम्पिक मध्ये तीन पदके जिंकण्यात यश मिळाले होते. आता लंडनमध्ये याची संख्या सहावर पोहोचली. त्यामुळे रिओमध्ये दहा पदकांची आशा करणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
यशासाठी सर्वांनी सोबत चालण्याची गरज - लंडन गेम्समध्ये नेमबाज विजयकुमार व सुशीलकुमार (रौप्य), नेमबाज गगन नारंग, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, बॉक्सर मेरी कोम, कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे सर्व जण पदक मिळवण्यात यशस्वी ठरले. बीजिंग ऑलिम्पिक मधील अभिनव बिंद्राच्या सुवर्ण कामगिरीनंतर क्रीडा मंत्रालयाने आॅपरेशन एक्सलन्स फॉर लंडन ऑलिम्पिक 2012 (ओपेक्स 2012) सुरू केले होते. यासाठी क्रीडा मंत्रालयाने 143 कोटींचे बजेट ठेवले व खेळाडूंना मदत केली. सरकारी मदतीसह गीत सेठीच्या ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट व लक्ष्मी मित्तलच्या ट्रस्टसारख्या काही खासगी संस्थांनीदेखील खेळाडूंना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
लाजवाब सुशील- सुशीलकुमार दोन ऑलिम्पिक पदके पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने बीजिंगमधील कांस्यपदकाला रौप्यमध्ये बदलले.
बदलावी लागेल जीवनशैली- आपल्या जीवनशैलीत खेळाला फारसे महत्त्व नाही. आमचा शैक्षणिक दर्जा खेळाला ‘टाइमपास’ पेक्षा दुसरे काही मानत नाही. लहान मुले खेळ ही बाब अत्यावश्यक समजणार नाहीत, तोपर्यंत क्रीडा क्षेत्राचा विकास होणार नाही. वैयक्तिक पदक विजेत्यांकडे पाहिल्यानंतर मला असे जाणवले की, त्यांच्या दृष्टीने सरकारी मदतीला फारसे महत्त्व नाही.
आणखी मजबुती हवी- अ‍ॅथलेटिक्स, जलतरण व जिम्नॅस्टिकमध्ये पदक मिळवणे आपल्यासाठी जिकिरीचे आहे. मात्र बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती,नेमबाजीसारख्या क्रीडा स्पर्धेत आपण सुवर्णपदकापर्यंत मजल मारू शकतो. आपण स्वत:तील मजबुतीला अधिक बळकटी देऊन आगामी काळातील योजनेची तयारी करायला हवी. रिओसाठी आपण आतापासूनच तयारी करायला हवी. (लेखिका लंडनमध्ये फ्री लान्सर आहेत)