आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल हुकल्याने रायडरला खेद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडरच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्याने चालण्यासही सुरुवात केली आहे. वैद्यकीय अहवालानुसार तो या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. आयपीएल खेळू शकणार नसल्याने रायडर चांगलाच दु:खी झाला आहे.
गुरुवारी क्राइस्टचर्च येथे रायडरवर हल्ला झाला होता. यात त्याच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर तो कोमात गेला होता. रायडरचा मॅनेजर अ‍ॅरोन क्ली याने दिलेल्या माहितीनुसार आता रायडरने रुग्णालयाच्या आपल्या खोलीत चालण्यास सुरुवात केली आहे. वेलिंग्टन विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्याने माहिती दिली.
क्ली म्हणाला, ‘रायडरच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता त्याला विश्रांतीची
गरज आहे. मागच्या 48 तासांत त्याच्या स्थितीत वेगाने सुधारणा झाली आहे. तो पायावर उभा होत आहे. त्याला पुन्हा उभे राहताना बघून चांगले वाटले.’