आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्ल्याबाबत रायडरला काहीच आठवत नाही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडरच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. तो बोलू लागला आहे. मात्र, हल्ल्याच्या घटनेबाबत त्याला सध्यातरी काहीच आठवत नाही.


रायडरचा मॅनेजर आरोन क्लीने ही माहिती दिली. ‘जेसीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. तो कोमातून बाहेर आला आहे. सध्यातरी त्याला या भयानक घटनेबाबत नीटपणे काहीच आठवत नाही,’ असे त्याने सांगितले. बारच्या बाहेर हल्ल्यानंतर रायडरला गुरुवारी रुग्णालयात गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. या घटनेत त्याच्या डोक्याला आणि छातीत गंभीर दुखापत झाली. श्वासाच्छ्वास घेण्यासाठी त्याला वैद्यकीय सुविधांची मदत घ्यावी लागली.
किवीज फलंदाजावर झालेल्या हल्ल्याच्या तपासणीत व्यग्र असलेल्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे