आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे राहते रिओत देशाला पहिले मेडल देणारी साक्षी, पाहा लहानपणीचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे साक्षी मलिकची रूम. तिच्या रूममध्ये साक्षीचे आई-वडिल... - Divya Marathi
ही आहे साक्षी मलिकची रूम. तिच्या रूममध्ये साक्षीचे आई-वडिल...
रोहतक- ऑलिंपिकच्या 12 व्या दिवशी 23 वर्षाच्या रेसलर साक्षी मलिकने कमाल केली. ती 58 किलो फ्री-स्टाईल रेसलिंगमध्ये 5-0 अशी मोठ्या फरकाने मागे पडली होती. मात्र, शेवटच्या 9 सेकंदात तिने बाजी पलटावत भारताला ब्राँझ जिंकून दिले. रिओत भारताचे हे पहिले मेडल आहे. आज आम्ही तुम्हाला साक्षी मलिकच्या आई-वडिलांना भेटून साक्षीशी संबंधित काही माहिती सांगणार आहोत...
- मुलीच्या विजयानंतर रोहतक जिल्ह्यातील मोखरा गावात राहणा-या साक्षीचे कुटुंबिय आनंदाने फुलले आहेत.
- साक्षीचा जन्म 3 सप्टेंबर 1992 रोजी झाला. वडील सुखबीर मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन (डीटीसी) मध्ये काम करतात.
- साक्षीची आई आंगनवाडी सुपरवायजर आहे, लढतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी त्यांचे साक्षीशी फोनवर बोलणे झाले होते.
- त्यावेळी साक्षीने आईला सांगितले होते की, मी मेडल घेऊनच येईन. त्यावेळी आई म्हणाली होती की, बेटा तुला मेडलसाठी नाही तर जिंकण्यासाठी खेळायचे आहे. जिंकत गेली तर मेडल आपोआपच तुझ्या मागे येईल.
- बुधवारी आईचा आशीर्वाद तिच्या कामी आला. रात्री तीन वाजता साक्षीने देशासाठी पहिले मेडल जिंकून दिले. मुलीची लढत पाहताना ती जिंकल्यानंतर ती आनंदाने नाचत होती.
- साक्षीचे आजोबा पैलवान होते तसेच आखाड्यात कुस्ती करायचे. साक्षी 12 वर्षापासून रेसलिंग करीत आहे.
- लहानपणी पैलवानाचा ड्रेस साक्षीसा खूप आवडायचा. तिने हट्ट करून एकदा तो ड्रेस घेतला व मी पैलवानच बनणार असे सांगितले.
- ती म्हणायची, मी विमानाने बसून जाईन व ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकेन. तिने हे शब्द खरे केले.
- साक्षीने 2010 साली ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ जिंकले होते. यानंतर तिने 2014 साली सीनियर लेवलवर डेव शुल्ज इंटरनॅशनल रेसलिंग टूर्नामेंटमध्ये गोल्ड जिंकला होते.
- आता तिने रिओत भारतासाठी पहिले ब्राँझ मेडल जिंकून देशाचा मान उंचावली आहे.
सर्व फोटोः जितेंद्र रिम्पी, रोहतक
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, साक्षी मलिकचे लहानपणीचे फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...