आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riturani Lead Women Hocky Team In Asia Cup Hocky

आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी रितुराणीकडे महिला हॉकी टीमचे नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या 21 सप्टेंबरपासून महिलांच्या आठव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी स्टार मिडफील्डर रितुराणीकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मिडफील्डर चंचनदेवी थोकचोमकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. हॉकी इंडियाने शुक्रवारी 18 सदस्यीय महिला संघ जाहीर केला. आशिया चषक 21 ते 27 सप्टेंबरदरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे.
भारतीय संघ 16 सप्टेंबरला मलेशियाला रवाना होणार आहे. स्पर्धेच्या अ गटात भारतासह चीन, मलेशिया, हाँगकाँग आणि ब गटात कोरिया, जपान, कझाकिस्तान आणि तैपेईचा समावेश आहे.


भारताचा पहिला सामना 21 सप्टेंबरला हाँगकाँगशी होईल. त्यानंतर भारतासमोर 22 सप्टेंबरला चीन व 24 सप्टेंबरला यजमान मलेशिया संघाचे आव्हान असेल.


संघात निवड झालेल्या महिला खेळाडू
गोलरक्षक : रजनी इतिर्मापू, सविता. डिफेंडर : दीप ग्रास एक्का, जॉयदीय कौर, किरणदीप कौर, सुनीता लाक्रा, दीपिका नमिता थापू, पी.सुशीला चानू, एम. एन. पुनम्मा. मिडफील्डर : रितुराणी (कर्णधार), चंचन देवी थोकचोम (उपकर्णधार), सौदर्या येंदाला, लिली चानू. फॉरवर्ड : पूनमराणी, राणी, वंदना कटारिया, अनिरुद्धा देवी.