आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्याने\' लकव्याला व डॉक्टरांनाही चकवा देत गाठले रिओ, आता भारतासाठी जिंकणार मेडल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटर प्रकाश नांजप्पा - Divya Marathi
शूटर प्रकाश नांजप्पा
तीन वर्षापूर्वी त्याला डॉक्टराने सांगितले होते की, आता तुझे करिअर संपले आहे. आता खेळायच्या भानगडीत पडू नको. मात्र, मी खेळू शकतो अशी मनात खूनगाठ बांधलेल्या या भारतीय नेमबाजाने डॉक्टरला चुकीचे ठरवत अखेर रिओ गाठले आहे. या भारतीय नेमबाजाचे नाव प्रकाश नांजप्पा. प्रकाश नांजप्पा ब्राझीलमध्ये पोहचला असून, रिओतील एका स्टेडियममध्ये नेमबाजीचा सराव करीत आहे. आता त्याचा निशाणा गोल्ड मेडल असून, त्याला डॉक्टरांना अजून एकदा चुकीचे ठरवायचे आहे. 2013 साली लकव्याने पकडले-
- 2013 साली नांजप्पाच्या करिअरमधील टर्निंग प्वाईंट आला.
- जेव्हा तो स्पेनमधील ग्रनाडा येथे सुरु वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान लकवाग्रस्त झाला.
- डॉक्टराने त्याचा चेहरा पाहून त्याला पॅरॉलिसिसचा आजार सांगितला. तसेच यापुढे तुला नेमबाजी सोडावी लागेल असे सांगितले.
- यामुळे प्रकाश मूळापासून हादरून गेला. त्याचा वाकडा झालेला चेहरा पाहिला की तो उदास व्हायचा.
डॉक्टराच्या शब्दांनीच प्रेरित केले-
- दोन-तीन महिन्यानंतर त्याला बरे वाटू लागले. काही दिवस घालवल्यानंतर आपण खेळू शकतो असे त्याला वाटू लागले.
- त्याने निश्चय केला की मैदानात परतायचेच. तू आता कधीच खेळू शकणार नाही व तुला नेमबाजी बंद करावी लागेल ही दोन वाक्येच त्याच्या डोक्यात फिरू लागली.
- डॉक्टरांच्या या शब्दांनीच त्याला प्रेरित केले. अखेर त्याने पुन्हा एकदा सराव सुरु केला.
- सुरूवातीला मोजका सराव सुरु ठेवला. नंतर आत्मविश्वास वाढला व सर्व काही पहिल्यासारखे घडू लागले.
मागील दोन वर्षे भरीव कामगिरी-
- आजारातून बाहेर पडल्यापासून गेली दोन वर्षे तो चांगली कामगिरी करीत आहे.
- 40 वर्षीय प्रकाश नांजप्पा रिओ ऑलिंपिकमध्ये 10 मीटर एयर पिस्टोल आणि 50 मीटर पिस्टोल स्पर्धा प्रकारातील एक नामांकित खेळाडू आहे.
- कॅनडा जाऊन स्थिरवल्यानंतर तो खेळापासून दूर गेला. मात्र 2009 मध्ये त्याने नेमबाजीकडे लक्ष केंद्रित केले.
- प्रकाश म्हणतो, मी 40 वर्षाचा असलो तरी ही फक्त संख्या आहे. माझ्या नेमबाजीवर याचा काहीच परिणाम होणार नाही.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, प्रकाश नांजप्पा याच्याबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...