आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer In Second Number In ATP Global Ranking

एटीपी जागतिक क्रमवारीत रॉजर फेडररची दुस-या स्थानावर धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - तब्बल १७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररने दोन दिवसांपूर्वी शांघाय मास्टर्सचा किताब जिंकून करिअरमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्याने प्रथमच या विजेतेपदावर नाव कोरले. यासह त्याने एटीपीच्या जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर धडक मारली. जगातील माजी नंबर वन राफेल नदालवर कुरघोडी करून त्याने दुसरे स्थान गाठले. यामुळे नदालची क्रमवारीत तिस-या स्थानावर घसरण झाली. सर्बियाच्या नोवाक योकोविकने क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले. त्याला शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फेडररने सरळ सेटमध्ये धूळ चारली होती. यासह त्याचे शांघाय मास्टर्सचा किताब जिंकण्याचे स्वप्न धुळीत मिळाले होते.

सोमदेवची घसरण
भारताचा सोमदेव देववर्मनची क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. तो आता १४३ व्या स्थानावर आला.