आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस ओपन; फेडररचा अनपेक्षित पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुरिच- जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररला शुक्रवारी स्विस ओपन टेनिस स्पर्धेत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत 55 व्या स्थानी असलेल्या डॅनियल ब्रॅड्सने दुसर्‍या फेरीत सनसनाटी विजय मिळवला. त्याने पुरुष एकेरीत स्विसच्या रॉजर फेडररला सरळ दोन सेटमध्ये 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. यासह त्याने फेडररला मागील आठवड्यात हॅम्बुर्ग टेनिस स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली.

या स्पर्धेत जर्मनीच्या डॅनियलला स्विसच्या खेळाडूने पराभूत केले होते. आता डॅनियलने घरच्या मैदानावर नऊ वर्षांनंतर दमदार पुनरागमन करण्याचे फेडररचे मनसुबे उधळून लावले.

निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या फेडररला यंदाच्या सत्रात हाले ओपनचा किताब जिंकता आला. मागील वर्षी त्याने विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. मात्र, या वर्षी त्याला स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला जागतिक क्रमवारीत 116 व्या स्थानी असलेल्या सर्जेई स्टाकोवस्कीने पराभूत केले होते. यंदाच्या सत्रात त्याला अद्याप विजयाचा सूर गवसला नाही. त्याला गत आठवड्यात हॅम्बुर्ग ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत अर्जंेटिनाच्या फ्रेडरिका डेलबोनिसकडून पराभव पत्करावा लागला होता.