आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer Nails A Backhand Winner During Sony Open Win

सोनी ओपन टेनिस स्पर्धा : फेडरर, मरे चौथ्या फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - दोन वेळचा चॅम्पियन रॉजर फेडरर आणि गतविजेता अँडी मरेने विजयी मोहीम अबाधित ठेवताना सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे महिला गटात डोमिनिका सिबुलकोवा, चीनची ली ना आणि रंदावास्कानेही चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.

पाचव्या मानांकित रॉजर फेडररने पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत थिएमो डे बाकेरला पराभूत केले. त्याने 6-3, 6-3 अशा फरकाने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. या पराभवासह बाकेरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच इंग्लंडच्या अँडी मरेने फेलिशियानो लोपेझला 6-4, 6-1 ने धूळ चारली. या विजयासह त्याने चौथ्या फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना फ्रान्सच्या विल्फ्रेंड त्सोंगाशी होईल. तिसर्‍या फेरीत 11 व्या मानांकित त्सोंगाने मार्कासला 4-6, 7-6, 7-5 अशा फरकाने पराभूत केले. यासाठी त्याला शर्थीची झुंज द्यावी लागली. पहिल्या सेटमधील अपयशातूून सावरलेल्या त्सोंगाने दमदार पुनरागमन करताना पुढील दोन्ही सेट आपल्या नावे केले. तसेच स्पेनच्या डेव्हिड फेररने लढतीत इटलीच्या आंद्रिया सेप्पीचा 6-3, 6-2 ने पराभव केला.

ली नाची मेडिसनवर मात
जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या ली नाने तिसर्‍या फेरीत अमेरिकेच्या मेडिसन किसला पराभूत केले. तिने 7-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. तिला पहिल्या सेटमध्ये शर्थीची झुंज द्यावी लागली. तिसर्‍या मानांकित अग्निजस्का रंदावास्काने रशियाच्या एलेना वेस्निनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. तिने 7-5, 6-3 ने तिसर्‍या फेरीचा सामना जिंकला. आता पोलंडच्या रंदावास्काचा सामना युक्रेनच्या 19 वर्षीय एलिना स्वितोलिनाशी होईल.

डोमिनिका सिबुलकोवाने एलिजे कोर्नेटवर 7-6, 6-4 ने मात केली. यासाठी तिला मोठी कसरत करावी लागली. दुसरीकडे कॅरोलिन वोज्नियाकीने अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सचा 6-1, 6-0 अशा फरकाने पराभव केला.