आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer News In Marathi, Sony Open Tennis, Andy Marry

सोनी ओपन टेनिस: रॉजर फेडरर, योकोविक, अँडी मरे तिस-या फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - विम्बल्डन चॅम्पियन अ‍ॅँडी मरे, स्विसचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोवाक योकोविकने सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. तसेच केई निशिकोरी, डेव्हिड फेररनेही पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत शानदार विजय मिळवून आगेकूच केली.


लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अ‍ॅँडी मरने पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनचा पराभव केला. त्याने 3-6, 6-0, 6-1 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याला शर्थीची झुंज द्यावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूने पहिला सेट जिंकून मरेविरुद्ध दमदार सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पुनरागमन करून इंग्लंडच्या मरेने दुस-या व तिस-या निर्णायक सेटमध्ये बाजी मारून सामना आपल्या नावे केला.
रॉजर फेडररने दुस-या फेरीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविकला पराभूत केले. त्याने सरळ दोन सेटमध्ये 6-4, 7-6 अशा फरकाने विजय मिळवला. इवोने दुस-या सेटमध्ये फेडररला चांगलेच झुंजवले. मात्र, ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेलेला हा सेट जिंकून स्विसच्या खेळाडूने तिसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत दुस-यास्थानी असलेल्या नोवाक योकोविकने फ्रान्सच्या जेर्मी चार्डीवर 6-4, 6-3 ने विजय मिळवला. निशिकोरीने दुस-या फेरीत माटोसेविकला 6-4, 6-1 ने पराभूत केले. डेव्हिड फेररने गाबाशिवलीला 6-4, 6-0 ने धूळ चारली.


सिबुलकोवाची आगेकूच
ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती डोमिनिका सिबुलकोवा, चीनची ली ना आणि अग्निजस्का रंदावास्कानेदेखील महिला एकेरीच्या तिस-या फेरीतील प्रवेश निश्चित केला. ली नाने दुस-या फेरीत वॉकओव्हर देण्यात आला. रंदावास्काने ओपार्डीला 6-0, 6-4 ने पराभूत केले. सिबुलकोवाने लढतीत मेऊसबुर्गेरवर 6-1, 6-2 ने मात केली.