Home | Sports | Other Sports | roger-federer-on-retirement

सध्या तरी निवृत्तीचा विचार नाही-फेडरर

वृत्तसंस्‍था | Update - Aug 10, 2011, 01:52 AM IST

स्वीसच्या अव्वल मानांकित फेडररने अद्याप तरी निवृत्तीचा विचार नसल्याची कबुली दिली.

  • roger-federer-on-retirement

    लंडन - टेनिसच्या विश्वात आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर एकेरी व दुहेरीच्या १६ ग्रॅण्डस्लॅमचा बहुमान पटकावणा-या स्वीसच्या अव्वल मानांकित फेडररने अद्याप तरी निवृत्तीचा विचार नसल्याची कबुली आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली. वयाची ३० वर्षे गाठणाºया फेडररने मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला. अनेक चाहत्यांसह आपल्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या बर्थ डे पार्टीला अनेक दिग्ग्जाची विशेष उपस्थिती होती. ८ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेला फेडरर मागील १५ वर्षापासून टेनिस विश्वात आपला दबदबा निर्माण करून सध्या आघाडीची खेळी करत आहे.
    एकेरीत ७८२ पैकी १८३ विजयाची नोंद करणाºया फेडररने आगासी व राफेल नदालवर कुरघोडी करून आघाडी घेतली आहे. दुहेरीतही फेडररने ११५ लढतीत ७४ वेळा बाजी मारत 8 वेळा किताबाचा बहुमानही पटकावला आहे.

Trending