आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारिया शारापोवाचा पराभव; रॉजर फेडररची आगेकूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनसिनाटी (अमेरिका) - अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सने सिनसिनाटी ओपन टेनिस स्पध्रेत सनसनाटी विजय मिळवताना रशियाच्या मारिया शारापोवाला स्पध्रेबाहेर केले. दुसरीकडे पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विजयी लय कायम ठेवताना आगेकूच केली.

तिसर्‍या मानांकित शारापोवाला स्पध्रेतील आपल्या पहिल्याच सामन्यात 6-2, 6-7, 3-6 ने पराभवाचा सामना करावा लागला. तिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दुसर्‍या फेरीत तिचा सामना स्टिफंससोबत झाला. शारापोवाने पहिला सेट 6-2 ने जिंकून चांगली सुरुवात केली होती. मात्र, अमेरिकेच्या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन करताना पुढचे दोन्ही सेट 7-6, 6-3 ने जिंकत सामना आपल्या नावे केला. बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने अमेरिकेच्या वानिया किंगला 6-1, 7-6 ने पराभूत करून तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला. तत्पूर्वी डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाकी, रशियाची एलिना वेस्निना, बेल्जियमची कस्र्टन लिपकेन्स, रशियाची मकारोवा यांनी आपापले सामने जिंकले.

फेडररचा सहज विजय
‘स्विसकिंग’ रॉजर फेडररने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत र्जमनीच्या फिलिप कोलश्वाईबरला 6-3, 7-6 ने हरवले. स्पेनच्या डेव्हिड फेररने अमेरिकेच्या रेयान हॅरिसनला 7-6, 3-6, 6-4 ने मात दिली. दुसर्‍या फेरीतच फ्रान्सच्या ज्युलियन बेनेटियूने अमेरिकेच्या ब्रायन बाकेरला हरवले. मिलोस राओनिक, स्टानिस्लास वावरिंका, जॉन इस्नर, मिखाईल योज्नी, टॉमी हॅस, फॅलिसियानो लोपेज यांनीसुद्धा आपापले सामने जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.