आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer, Rafael Nadal Reach Monte Carlo Masters 3rd Round

मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत योकोविक, नदाल, फेडरर तिसर्‍या फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोंटेकार्लो - जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक योकोविकने मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सुरुवात करताना पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. इतर सामन्यांत राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी दुसर्‍या फेरीतील सामने जिंकले.

दुसरा मानांकित योकोविकने दुसर्‍या फेरीत स्पेनच्या एलबर्ट मोंटानेसला सरळ सेटमध्ये 6-1, 6-0 ने पराभूत करून तिसरी फेरी गाठली. क्ले कोर्टवर आपल्या पहिल्या सामन्यात योकोविकने सलग 11 गेम जिंकले. 45 मिनिटे चाललेला सामना त्याने एकतर्फी स्टाइलने आपल्या खिशात घातला. दुसर्‍या सेटमध्ये विरोधी स्पॅनिश खेळाडू योकोविकसमोर टिकू शकला नाही. त्याला एकही गुण मिळवता आला नाही.

इतर पुरुष एकेरीच्या सामन्यात पाचवा मानांकित चेक गणराज्याच्या टॉमस बर्डिचने रशियाच्या दिमित्री टूरसुनोवला 7-5, 6-4 ने तर सहावा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने फ्रान्सच्या जर्मी चार्डीला 6-3, 6-0 ने पराभूत करून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. नदालने दुसर्‍या फेरीत रशियाचा क्वालिफायर खेळाडू तैमूराज गबाशविलीला 6-4, 6-1 ने हरवले. दुसरीकडे फेडररने दुसर्‍या फेरीत चेक गणराज्याच्या रादेक स्तेपानेकला 6-1, 6-2 ने पराभूत केले.