लंडन - अव्वल मानांकित नोवाक योकोविकने विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, लियांडर पेस आणि
सानिया मिर्झा यांच्या आपापल्या गटातील पराभवासोबतच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सर्बियाचा टेनिस स्टार योकोविकने तब्बल तीन तास दोन मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवचा 6-4, 3-6, 7-6, 7-6 असा पराभव केला. करिअरमधील तेविसावी ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असलेल्या योकोविकने 23 वर्षीय दिमित्रोवला निर्णायक क्षणी बेसलाइनवरच व्यग्र ठेवण्यात यश मिळवत सामना जिंकला.
पेस-स्टेपानेक जोडी पराभूत
भारताचा लियांडर पेस आणि रादेक स्टेपानेक जोडीला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि याबरोबरच भारताचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. अमेरिकेचा जेक सोक आणि कॅनडाच्या वासेक पोसपिसिल जोडीने त्यांचा 7-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.
सानिया-टेकाऊ पराभूत
भारताची सानिया मिर्झा आणि रोमानियाचा होरिया टेकाऊला मिर्श दुहेरीच्या तिसर्या फेरीत दहाव्या मानांकित जेर्मी मरे आणि सी. डेल्लासिक्युआने 7-5, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. सहाव्या मानांकित सानिया-टेकाऊने पहिल्या सेटमध्ये चोख खेळी केली. मात्र, ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेल्या या सेटमध्ये दहाव्या मानांकित जोडीने बाजी मारून आघाडी मिळवली.
(फोटो - नोवाक योकोविक)