आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विम्बल्डनच्या टेनिस परंपरेला ऑलिम्पिकची साथ लाभतेय. ब्रिटनच्या अँडी मुरेमुळे ब्रिटिश पाठीराख्यांचे पाय पुन्हा एकदा विम्बल्डनकडे वळले आहेत. मुरेने सहज विजय मिळवला असला तरीही रॉजर फेडररला पाहण्यात ब्रिटिशांना अधिक रस होता. मुरेइतकाच पाठिंबा ब्रिटिशांनी रॉजर फेडररला दिला होता. अज्रेंटिनाच्या दिएगोने पहिल्या सेटमध्ये रॉजर फेडररची सर्व्हिस ब्रेक केली आणि तमाम ब्रिटिश प्रेक्षक हळहळले. मात्र फेडरर तिसर्या सेटमध्ये विजयासाठी (19-17 पर्यंत) झुंजला. त्या वेळी फेडररला मायदेशात असल्यासारखे वाटले.
एकीकडे रॉजर फेडरर झुंज देत असताना भारताच्या मिर्श दुहेरीच्या पेस-मिर्झा जोडीला चिअर करण्यासाठी भारतीयांची फौजही हजर होती. शुक्रवारी वेळेअभावी या जोडीचा सामना न होऊ शकल्यामुळे हे भारतीय सर्मथक नाराज झाले होते. पेस-सानिया मधल्या मोकळ्या कोर्टवर वॉर्म अप करत असताना भारतीयांनी या खेळाडूंसोबत आपले फोटो काढून घेण्यात धन्यता मानली.
धामधूम समारोप सोहळ्याची - डॅनी बॉयल यांच्या उद्घाटन सोहळ्याबाबतची चर्चा थांबते न थांबते, तोच आता लंडनवासीयांना वेध लागले आहेत इस् डेव्हलिन यांच्या समारोप सोहळ्याचे. इस् डेव्हलिन यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज होत असलेल्या या सोहळ्याची मध्यवर्ती कल्पना आहे लंडन शहराची सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक श्रीमंती दाखवणे. डॅनी बॉयल यांनी इंग्लंडची हरित क्रांती दाखवली होती. समारोप सोहळ्यात डॅनी बॉयल यांच्या सोहळ्यापेक्षा वेगळा असेल, मती गुंग करणारा असेल, असे या समारंभाचे डायरेक्टर डेव्हलिन यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.