आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ओपन टेनिस : रॉजर फेडररची आगेकूच सुरूच, रंदावास्काला पराभवाचा झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - चौथे मानांकन प्राप्त स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने शुक्रवारी रशियाच्या दिमित्री तुसरुनोव्हला संघर्षपूर्ण लढतीत पराभूत करून फ्रेंच ओपन टेनिस स्पध्रेच्या पुरुष गटाच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला, तर तिसरे मानांकनप्राप्त पोलंडच्या एग्निस्जका रंदावास्काला पराभवाचा झटका बसल्याने महिला गटात मोठा उलटफेर झाला.

17 ग्रँडस्लॅम स्पध्रेचा विजेता फेडररला या स्पर्धेत 31 वे मानांकन असलेल्या तुसरुनोव्हाने चांगलेच झुंजवले. चार सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात फेडररने 7-6, 6-7, 6-2,6-4 असा विजय मिळवला. दुसरीकडे, चेक गणराज्यचा रादेक स्टेपानेकने लॅटिव्हियाच्या अर्नेस्ट गुल्बिसला हरवून तब्बल सात वर्षांनंतर ग्रँडस्लॅम स्पध्रेच्या अंतिम-16 मध्ये जागा बनवली. महिला गटात शुक्रवारी मोठा उलटफेर बघायला मिळाला. विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या रंदावास्काला पराभवाचा धक्का बसला. क्रोएशियाची बिगरमानांकित अँल्जा टॉमजानोव्हिकने तिचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून खळबळ माजवून दिली. स्पध्रेचे नववे मानांकन असलेली स्लोव्हाकियाची डोमिनिका सिबुलकोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या सामंता तोसुरला 6-4, 6-4 ने पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर अन्य एका सामन्यात स्पेनची कार्ला सुआरेज नवारो हिने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडचा 6-2, 6-2 असा थेट पराभव केला.

सिमोना, क्वितोव्हा पुढच्या फेरीत
रोमानियाची सिमोना हालेप व माजी चेक गणराज्यची पेत्रा क्वितोवा यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांना अगदी आरामात हरवून फ्रेंच ओपन टेनिस स्पध्रेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

छायाचित्र :तिसर्‍या फेरीच्या लढतीत परतीचा फटका मारताना रॉजर फेडरर