आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer To Open His Mission From Brisbane Open

ब्रिस्बेनपासून फेडरर करणार श्रीगणेशा, पुढच्या सत्रासाठी आतापासूनच नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू रॉजर फेडरर ग्रँडस्लॅमच्या आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी पुढच्या सत्रात ब्रिस्बेन इंटरनॅशनल ओपनपासून अभियानाला सुरुवात करेल.

गेल्या दहा वर्षांत प्रथम क्रमवारीत इतक्या खाली आलेल्या फेडररला विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीत आणि त्यानंतर झालेल्या हॅम्बुर्ग ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात 114 व्या क्रमांकाचा खेळाडू फेडेरिको डेलबोनिसकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याने 2014 च्या सत्रात ब्रिस्बेन ओपनपासून अभियानाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी ही माहिती दिली.

फेडररनेसुद्धा याबाबत दुजोरा दिला आहे. ‘मला नेहमी ब्रिस्बेनमध्ये खेळण्याची इच्छा होती. आता मी तेथे खेळू शकेन, याचा आनंद आहे. फक्त ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मी ब्रिस्बेनला जात नसून मला या स्पर्धेचे विजेतेपद जिंकायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया फेडररने व्यक्त केली.