Home | Sports | Other Sports | roger federer win sinsinati masters

सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत फेडररची डेल पेड्रोवर मात

वृत्तसंस्था | Update - Aug 18, 2011, 11:27 AM IST

जागतिक क्रमवारीतील नंबर तीनचा खेळाडू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पराभवाच्या जुन्या स्मृतींना मागे टाकत येथे सुरू असलेल्या सिनसिनाटी ओपन टेनिस स्पध्रेत विजयाची नोंद केली आहे.

  • roger federer win sinsinati masters

    मॅसोन - जागतिक क्रमवारीतील नंबर तीनचा खेळाडू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पराभवाच्या जुन्या स्मृतींना मागे टाकत येथे सुरू असलेल्या सिनसिनाटी ओपन टेनिस स्पध्रेत विजयाची नोंद केली आहे. फेडररने अज्रेंटिनाचा खेळाडू जुआन मार्टिन डेल पेड्रो याला 6-3, 7-5 ने पराभूत केले.

    2009 च्या अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये याच डेल पेड्रोने फेडररला पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर दुखापतींमुळे तो त्रस्त झाला. मात्र, सिनसिनाटी स्पध्रेत त्याच्याविरुद्ध सेट जिंकताना फेडररला जास्त पर्शिम घ्यावे लागले नाहीत.

    दुसर्‍या सेटमध्ये बाजी चांगलीच रंगली. दोन्ही खेळाडू 6-5 अशी झुंज देत होते. या गेममध्ये फेडररने सहा ब्रेकपॉइंट गमावले. अखेरीस त्याने बाजी मारली.

Trending