आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडररचा निर्णायक विजय; स्वित्झर्लंड उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनेव्हा - स्वित्झर्लंडने तब्बल 11 वर्षांनंतर डेव्हिस चषक वर्ल्ड गु्रपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या टीमने उपांत्यपूर्व लढतीत कझाकिस्तानचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. रॉजर फेडरर हा या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने मिळालेल्या निर्णायक विजयाच्या बळावर स्विस टीमला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता आला. फेडररने लढतीत आंद्रेया गोलबेवला पराभूत केले. त्याने 7-6, 6-2, 6-3 अशा फरकाने एकेरीचा निर्णायक सामना जिंकला. यासाठी कझाकिस्तानच्या आंद्रयाने फेडररला चांगलेच झुंजवले.
फेडररसह हेन्री लाकसोनेन, मार्को चिउडिनेल्ली, मिचेल लामॅर आणि स्टॉनिलास वांवरिंकाने केलेल्या कामगिरीच्या जोरावर स्विसने यश संपादन केले.
इटली अंतिम चारमध्ये : फेबियो फोगनिनीच्या शानदार विजयासह इटलीने डेव्हिस चषकाच्या अंतिम चारमधील स्थान निश्चित केले. इटलीने उपांत्यपूर्व लढतीत अँडी मरेच्या इंग्लंडला 3-2 अशा फरकाने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानी असलेल्या फोगनिनी लढतीत अँडी मरेला 6-4, 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.
आंद्रेया पेत्कोविक चॅम्पियन
जर्मनीची आंद्रेया पेत्कोविक फॅमिली सर्कल चषक टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्लोव्हाकियाच्या जाना सेपेलोवाचा पराभव केला. तिने 7-5, 6-2 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह तिने चषकावर नाव कोरले. स्लोव्हाकियाच्या खेळाडूने दुसºया फेरीत जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सला पराभूत करून आगेकूच केली होती.